राज्य सरकारने सुरू केलेल्या ग्राम वास्तव्याला धामणे गावातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बेळगाव तालुक्यातील धामणे गावात तहसीलदार आर के कुलकर्णी व तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी धामणे येथे ग्राम वास्तव्य केले.
या वेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक समस्या जाणून घेण्यासाठी आणि नागरिकांना सहकार्य करण्यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले आहेत. बेळगाव तालुक्यातील धामणे गावात हा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामस्थांच्या वतीने विविध समस्या मांडण्यात आल्या. त्या सोडवण्यासाठी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
याचबरोबर ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्यांनी तातडीने तालुका पंचायतशी संपर्क साधून त्या निवारण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासनही दिले. याच बरोबर आर. के. कुलकर्णी यांनी वृद्धा पेंशन व इतर समस्यांबाबत नागरिकांकडून माहिती जाणून घेतली आणि ती सोडून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामस्थांनी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी व तहसीलदार यांचा सत्कार केला आणि त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. याचबरोबर गावातील विविध समस्या मांडून त्याचे निरसन करावे अशी मागणी केली. यावेळी तालुका पंचायत सदस्य नारायण नलवडे व नुतन ग्रामपंचायत सदस्य ही उपस्थित होते.