कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निवळला असला तरी धोका टळलेला नाही. तेंव्हा आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अन्य बाबींबरोबरच जलतरणचा आनंद लुटत शारीरिक तंदुरुस्तीला प्राधान्य द्या, असे आवाहन स्विमर्स क्लब आणि ॲक्वेरियस क्लब बेळगाव यांनी केले आहे.
सदर आवाहन करण्यामध्ये प्राधान्याने स्विमर्स क्लब आणि ॲक्वेरियस क्लबचे प्रमुख उमेश कलघटगी यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या एक-दीड वर्षापासून कोरोनाने सर्वांना जेरीस आणले आहे. सामाजिक स्वास्थ्यावर कोरोना प्रादुर्भावाने गंभीर परिणाम केला आहे. कोरोनावर मात करण्यात सध्या जवळपास यश आले असले तरी लोकांच्या कमकुवत झालेल्या शारीरिक तंदुरुस्ती व प्रतिकारशक्तीचा मुद्दा अद्याप “जैसे थे” आहे.
शारीरिक तंदुरुस्ती व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अन्य उपायांबरोबरच जलतरण हे देखील प्रभावी माध्यम आहे. यासाठी सुवर्णा जेएनएमसी जलतरण तलावाच्या व्यवस्थापन मंडळाने सर्व ती जय्यत तयारी केली आहे. कोरोनासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करत हा जलतरण तलाव अबालवृद्धांसाठी खुला झाला आहे.
प्रशिक्षण आणि मार्गदर्शनासाठी याठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू घडविलेल्या तज्ञ मंडळींचे पथक तैनात असणार आहे. तेंव्हा या सुविधेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी 9448187333 किंवा 9845429093 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.