पत्ते खेळतांना पोलीस येण्याच्या भीतीने काही जणांनी नदीत उडी घेतली असल्याची घटना रामदुर्ग येथे घडली आहे.
रामदुर्ग तालुक्यातील मलप्रभा नदीतीरावर पत्त्यांचा खेळ खेळणाऱ्या काही जणांना पोलीस येण्याची चाहूल लागली, पोलिसांच्या येण्याच्या भीतीने सर्वांनी नदीत उडी घेतली असून दोघे बेपत्ता आहेत.
रविवारी संध्याकाळी नदीतीरावर काहीजण पत्त्यांचा खेळ खेळण्यात रमले होते. दरम्यान कुणाचातरी ओरडण्याचा आवाज आला, आणि कदाचित पोलीस आले असावेत, या भीतीने सहा जणांनी नदीमध्ये उडी घेतली. या सहा जणांपैकी चौघांनी नदीबाहेर येऊन पळ काढला असून इतर दोघांचा शोध सुरु आहे.
या सहाजणांपैकी मंजू बंडीवड्डर (वय ३०), समीर बटकुर्ती (वय २२) हे दोघे बेपत्ता आहेत.
तर इतर चौघा फरारी आहेत. बेपत्ता झालेल्या युवकांचा अग्निशामक दलातर्फे शोध घेण्यात येत आहे.