श्रीराम सेना हिंदुस्तानची जिल्हास्तरीय बैठक रविवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी पार पडली. जुने बेळगाव येथील साई भवन येथे पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून हुक्केरी मठाचे स्वामी श्री अभिनव मंजुनाथ श्री हे उपस्थित होते.
या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला उपस्थित असलेल्या हुक्केरी मठाचे स्वामी श्री अभिनव मंजुनाथ यांनी हिंदू संस्कृतीचे महत्व सांगितले. तसेच हिंदू संस्कृती जपली पाहिजे आणि हिंदू संस्कृतीचा आदर केला पाहिजे, असे सांगितले.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी सुवर्ण सिंहासनाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुवर्ण सिंहासन खडा पहारा नाव नोंदणीसाठी जास्तीत जास्त युवकांनी पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले. ग्राम पंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर यापुढील काळात श्रीराम सेना हिंदुस्थान सर्व निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या १४ फेब्रुवारी रोजी देशभर व्हॅलेंटाईन डेचे आचरण तरुण तरुणी करतात. परंतु व्हॅलेंटाईन डे हा हिंदू संस्कृतीचा भाग नसून पाश्चात्य संस्कृतीत साजरा केला जाणारा दिन आहे. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण युवापिढीने करू नये, असे आवाहन रमाकांत कोंडुसकर यांनी केले.
शहापूर पोलिसांच्या पुढाकाराने पॉक्सो कायद्यांतर्गत तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली. या बैठकीत शहापूर पोलीस स्थानकाचे पीएसआय यांचा या कारवाईबद्दल सत्कार करण्यात आला. बैठकीला श्रीराम सेना हिंदुस्तानचे बेळगाव विभाग पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.