कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर या ना त्या प्रकारे आरोप करत आरोपांची मालिका सुरु केलेले आमदार बसनगौडा पाटील – यत्नाळ यांना भाजप हायकमांडने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्येच राहून भाजपच्याच मुख्यमंत्र्यांवर आरोपाच्या फैरी झाडणारे आमदार बसनगौडा पाटील – यत्नाळ हे चांगलेच चर्चेत आले आहेत. वारंवार असे आरोप करणारे बसनगौडा पाटील हे भाजप हायकमांडच्या नजरेत आले असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
भाजपचे केंद्रीय शिस्त समितीने ही नोटीस बजावली असून स्वतःच्या पक्षावर अशापद्धतीने आरोप करत पक्षाची शिस्त भंग केल्याच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली आहे. सतत आरोप करणाऱ्या बसनगौडा पाटील यांना नेमकी कोणती गोष्ट खटकली आहे? आणि कोणत्या कारणास्तव स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यांवर असे आरोप त्यांनी केले आहेत? याचा खुलासा कारणे दाखवा नोटीसच्या उत्तरावरून मिळेल अशी शक्यता आहे.
हायकमांडने बजाविलेल्या या नोटिसीला लवकरात लवकर उत्तर देण्याची सूचना करण्यात आली असून, या नोटीसला कोणत्या प्रकारे बसनगौडा पाटील उत्तर देतात, याकडे पहावे लागेल.