बेळगावात मराठी माणसावर अन्याय झाला तर त्याचे पडसाद कोल्हापूर मुंबईत उमटतात म्हणूनच कर्नाटकी पोलीस दचकून आहेत असे मत सीमाभागाचे नेते किरण ठाकूर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री आणि सीमा समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनने सीमाभागासाठी देऊ केलेल्या हायटेक आणि कार्डियाक सुविधा असणाऱ्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा रविवारी आज सायंकाळी उत्साहात पार पडला.
रामलिंग खिंड गल्ली येथील शिवसेनेच्या कार्यालयासह आज सायंकाळी आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून म. ए. समितीचे नेते आणि दै. तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर उपस्थित होते. त्याप्रमाणे व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, संघटक दत्ता जाधव, माजी महापौर सरिता पाटील, निपाणी म. ए. समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर आणि माजी नगरसेविका वर्षा आजरेकर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर अरविंद नागनुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हायटेक रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे किरण ठाकूर यांनी फित कापून रुग्णवाहिकेचे उद्घाटन करताना ती लोकार्पण केली.
एस एम जोशी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीची स्थापना झाली होती त्यामधून सीमाबप्रश्न सुटला असता पण तसे झाले नाही मात्र नजिकच्या काळात हा प्रश्न सुटावा रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून सिमावासीयांच्या मागे कुणाचा तरी आधार आहे ही भावना आज सिमवासीयांना आधार शिवसेनेचा आहे शिवसेनेने सुरुवातीला 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण म्हणून याची सुरुवात केली होती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दररोज शेकडो लोकांची मदत करत असत असे ठाकूर म्हणाले.
महाराष्ट्रात सामील होण्याच्या मागणीवर सीमाभागातील सगळेजण एकत्र आहेत काही जणांना आमदार नगरसेवक व्हायचं असत त्यावरून सगळं चाललेलं असत.राष्ट्रीय पक्षात काहीजण विखुरलेले आहेत त्या सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न युवा समिती करत असते असे ते म्हणाले.
याप्रसंगी किरण ठाकूर, अरविंद नागनुरी, प्रकाश शिरोळकर, जयराम मिरजकर, म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, अरुण कानूरकर, हेल्प फॉर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास शिवसेनेचे सुनील देसुरकर, राजकुमार बोकडे, दिलीप बैलूरकर, राजू तुडयेकर, शिवसेनेचे बेळगाव तालुका प्रमुख सचिन गोरले, डॉ. किरण पाटील, मोहन कारेकर, रंगनाथ जाधव, रवींद्र जाधव, दयानंद चोपडे, बंडू केरवाडकर बाळासाहेब डंगरले, प्रवीण तेजम, महादेव गावडे, रंगनाथ जाधव आदींसह म. ए. समिती व शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित होते.
बेळगावसह आसपासच्या परिसरातील जनतेला आपत्कालीन परिस्थितीत उपयोग व्हावा, यासाठी सदर हायटेक रुग्णवाहिका बेळगाव शिवसेना शाखेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका शहरांमध्ये विनामूल्य सेवा देणार असून परगांवच्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या इच्छेनुसार मदत करावयाची आहे.
https://www.facebook.com/livebelgaum/videos/882281272562731/
What shivsena doing here….. Nothing will happen…