बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असतानाच काँग्रेस पक्षाच्या निवडणूक पूर्व हालचालींना वेग आला आहे.अद्याप काँग्रेस किंवा भाजप यांचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत.भाजप मध्ये तर इच्छुकांची भाऊ गर्दी आहे.काही जण तर आपल्याला उमेदवारी मिळाल्याच्या आविर्भावात वावरत आहेत.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात आमदार सतीश जारकीहोळी आणि अन्य दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे.पण आमदार सतीश जारकीहोळी हेच भाजप उमेदवाराला कडवी लढत देवू शकतील असे मत काँग्रेस पक्षातून व्यक्त होत आहे.या साऱ्या पार्श्वभुमीवर आमदार सतीश जारकि होळी यांनी सावधपणे हालचाली सुरू केल्या आहेत.त्याचा फायदा काँग्रेस उमेदवार कोणीही ठरला तर त्याला होणार हे निश्चित आहे.
सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी बेळगाव दक्षिण मतदार संघात भेटीगाठी आणि बैठकांचा जोर लावला .मागच्या निवडणुकीत दक्षिण मतदार संघातून लाखाहून अधिक मते भाजपला मिळाली होती.त्यामुळे दक्षिण मतदार संघात सतीश जारकीहोळी यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
अनेक गटांच्या बैठका त्यांनी घेतल्या आहेत.अनेक माजी नगरसेवकांच्या भेटीगाठी देखील त्यांनी घेतल्या असून निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याची मागणी केली.अनेकांनी त्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन देखील दिले आहे.त्यामुळे पोट निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला आहे.
आगामी पोट निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून जर सतीश जारकीहोळी रिंगणात असतील तर निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत तसे न झाल्यास भाजपला केक वाक असू शकतो असे देखील जाणकारांचे म्हणणे आहे.काँग्रेसचा उमेदवार अद्याप ठरला नसला तरी सतीश जारकीहोळी यांनी दक्षिण बेळगाव मध्ये भेटीगाठी घेत चाचपणी करायला सुरुवात केली आहे.
जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या माध्यमातून आणि अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संपर्कातील लोकांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या.नाझर कॅम्प वडगांव, विणकर समाज यात्रोत्सव आणि मच्छे भागात त्यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या आहेत.
ज्याला मराठी भाषिकांची कदर नाही आशा नेत्यांना लोकांनी मत देऊ नयेत.