केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी नुकतीच घेतली.
या भेटीदरम्यान बेळगावमध्ये सैन्य शाळा सुरु करण्यासंबंधी केंद्राकडे आग्रह करण्यात आला आहे. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात देशभर सैन्य प्रशिक्षण शाळा सुरु करण्याविषयी तरतुदीची घोषणा केली.
या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातही सैन्य शाळा सुरु करण्याविषयी रमेश जारकीहोळी यांनी राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली.
बेळगावमध्ये कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या नावे मुलींसाठी आणि संगोळी रायन्ना यांच्या नावे मुलांसाठी सैन्य शाळा सुरु करण्यासाठी त्यांनी मागणी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांकडेदेखील पत्रव्यव्हाराने मागणी करण्यात येणार असल्याची माहिती रमेश जारकीहोळींनी दिली आहे.