मागील दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. आता पुन्हा ढगाळ वातावरणामुळे अनेक शेतकरी चिंतेत पडले असून पुन्हा जर पाऊस पडला तर मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे सध्या तरी पाऊस नको रे बाबा! अशी प्रतिक्रिया शेतकर्यांतून व्यक्त होत आहे.
सध्या कडधान्य पिके काढण्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यातच अवकाळी पावसाने सुरुवात केल्यामुळे अनेक पिके खराब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे येळ्ळूर व इतर भागातील कडधान्य पिके खराब झाली होती.
आता पुन्हा जर पाऊस पडला तर मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे सध्या तरी पाऊस नको रे बाबा अशी मागणी शेतकर्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पडलेल्या पावसामुळे हरभरा, मसूर, वाटाणा यासह इतर पिके खराब झाली होती.
आता जर पुन्हा पाऊस पडला तर अनेक कडधान्य पिके असलेली ती खराब होणार आहेत. त्यामुळे सध्या तरी शेतकरीवर्गाने पावसाचा धसका घेतला आहे. दोन दिवसापूर्वी अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती.
सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकरी कडधान्य पिके वाचविण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे नुकताच पडलेला पाऊस अनेक शेतकऱ्यांना त्रासदायक ठरला आहे. दरम्यान अवकाळी पाऊस मे महिन्यानंतर येतो, मात्र यंदा फेब्रुवारीतच या पावसाचे आगमन झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.