Wednesday, January 15, 2025

/

रेल्वे पोलिसांमुळे मिळाली हरवलेली बॅग

 belgaum

म्हैसूर – अजमेर रेल्वेतून प्रवास करताना बेळगावच्या रहिवाशांची बॅग हरवली होती. या बॅगमध्ये सुमारे २ लाखाहून अधिक किमतीचे साहित्य होते. बॅग मालकाने रेल्वे पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार रेल्वे पोलिसांनी या बॅगचा शोध घेऊन सदर बॅग साहित्यासह सुखरूपपणे मालकाकडे सुपूर्द केली आहे.

५ फेब्रुवारी रोजी बेळगावमधील कॅम्प परिसरातील आयुब चौधरी नामक व्यक्ती म्हैसूर – अजमेर रेल्वेतून प्रवास करून बेळगावमध्ये आली. परंतु अनावधानाने त्यांच्याजवळील २ लाख ९ हजार रुपयांचे साहित्य असलेली बॅग रेल्वेमध्ये हरवली.

यासंदर्भात त्यांनी रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली. रेल्वे पोलीस विभागाने यासंदर्भात तपास करून सदर व्यक्तीची बॅग शोधून दिली. रेल्वेमध्येच विसरलेल्या दोन्ही बॅग आयुब चौधरी यांना रेल्वे पोलिसांनी साहित्यासह परत केल्या.

रविवार दि. ७ फेब्रुवारी रोजी आयुब चौधरी यांना रेल्वे पीएसआय सत्यम एम., एएसआय नटराज टी., कर्मचारी हणमंत सप्तसागर, सुरेंद्र विभूती आणि मलिक मुल्ला यांच्या उपस्थितीत बॅग परत करण्यात आली. रेल्वे पोलिसांच्या या मदतीबद्दल आयुब चौधरी यांनी आभार व्यक्त केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.