गेल्या डिसेंबर 2020 मधील शहर जोडी निहाय प्रवासी संख्या, फ्राईट आणि टपाल वाहतुकीच्या आकडेवारी आधारे डीजीसीएने जाहीर केलेल्या माहितीनुसार (तात्पुरत्या) बेळगाव -हैदराबाद हवाई मार्ग सर्वात लोकप्रिय हवाई मार्ग ठरला आहे.
बेळगाव -हैदराबाद या मार्गावर डिसेंबर 2020 मध्ये जवळपास 6500 प्रवाशांनी आगमन आणि प्रस्थान केले आहे. बेळगाव येथून हैदराबादसाठी 4 विमानसेवा असून पहिल्या दिवसापासून या मार्गावरील प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. हैदराबाद खालोखाल बेंगलोर आणि बेंगलोर मागोमाग मुंबई, कडप्पा, म्हैसूर, तिरुपती, इंदोर व सुरत हे लोकप्रिय हवाई मार्ग आहेत. गेल्या जानेवारी 2021 मध्ये नासिक व चेन्नई अशा आणखी दोन शहरांना बेळगाव जोडले गेले आहे. त्याप्रमाणे स्पाईस जेटने आता आपली बेंगलोर विमान सेवा सुरू केली आहे.
गेल्या जानेवारी महिन्यात बेळगाव विमानतळावरून उपरोक्त शहरांना ये-जा केलेल्या प्रवाशांची संख्या पुढील प्रमाणे आहे. हैदराबाद : 6513 प्रस्थान -6561 आगमन, बेंगलोर :3525 -3634, मुंबई :2718 -3050, कडप्पा :1326 -1303, म्हैसूर :1082 -1107, पुणे :731 -735, तिरुपती :645 -712, इंदोर :505 -545, सुरत :115 प्रस्थान -188 आगमन.