फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि कर्नाटक राज्य वनखाते यांनी संयुक्तरीत्या मोहीम राबवून बेळगावातील विविध भागात पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असलेले तीन पोपट ताब्यात घेऊन त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले.
फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि कर्नाटक राज्य वनखाते यांनी संयुक्तरीत्या मोहीम राबवून शहरातील देशपांडे गल्ली येथे पिंजऱ्यात बंदिस्त केलेल्या दोन पोपटांची आणि कॅम्प येथील एका बंदिस्त पोपटाची सुटका केली.
या तीनही ही पोपटांना ताब्यात घेऊन त्यांना व्हीटीयु समोरील जंगलामध्ये नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
उपरोक्त कारवाईप्रसंगी वनखात्याचे डीएफओ व्ही. अमरनाथ, आरएफओ शिवानंद मगदूम, डेप्युटी आरएफओ विनय गौडर, रमेश गिरीयप्पनावर, वनरक्षक एम. ए. किल्लेदार आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर उपस्थित होते.
उपरोक्त कारवाईस सहकार्य केल्याबद्दल कर्नाटक पशु कल्याण मंडळाच्या सदस्य डॉ. सोनाली सरनोबत यांना धन्यवाद देण्यात आले आहेत.