तातडीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव शहर आणि परिसरात रविवारी दिनांक १४ फेब्रुवारी रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कॅंटोन्मेंट, नानावाडी, हिंदवाडी, मारुती गल्ली, शहर, टिळकवाडी, शहापूर, पाटील गल्ली, 33KV, फोर्ट रोड,
केएआयडीबी ऑटोनगर इंडस्ट्रियल एरिया, केएचबी कॉलनी, यमनापूर, आयुर्वेदिक कॉलेज, बाजार गल्ली, वडगाव, वाघवडे, जुने बेळगाव, होसूर, सुभाष मार्केट, विद्यानगर, भाग्यनगर,
येळ्ळूर रोड आदी भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. नागरिकांची याची दखल घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमतर्फे करण्यात आले आहे.