महाराष्ट्र, केरळमधील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या चिंतेचे कारण बनत चालले आहे. कर्नाटकात पुन्हा कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी आरोग्य खात्याच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. घटत चाललेल्या कोविड रुग्णसंख्येत पुन्हा हळू हळू वाढ होत चालल्याचे निदर्शनास येत आहे.
राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिन च्या आकडेवारीनुसार आज बेळगाव जिल्ह्यात १० नव्या कोविड रुग्णांची वाढ झाली आहे. यापैकी बेळगाव तालुक्यातील 7 आणि रायबाग तालुक्यातील प्रत्येकी 3 अशा एकूण १0 रुग्णांचा समावेश आहे.
सध्या ८३ कोरोनाबाधित रुग्ण आयसोलेशन कक्षात दाखल असून आजपर्यंतच्या एकूण कोविड रुग्णांची संख्या २६८७० इतकी आहे. तर ३४२ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र, केरळ राज्यात पुन्हा कोरोनाची धास्ती वाढली असून कर्नाटकात देखील कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. सरकारने दिलेल्या मार्गसूचीनुसार प्रत्येकाने कोविड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.