बेळगाव परिसरातील स्थानिक कलाकारांच्या सहयोगाने ‘इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन’च्यावतीने ‘गल्लीmates’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटात बेळगाव परिसरातील स्थानिक प्रतिभावंत कलाकारांना संधी दिली जाणार आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध लेखक आणि अभिनेते विकास पाटील यांनी दिली आहे.
‘गल्ली मेट्स’ चित्रपट बेळगावातील तरुण पिढीच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटात कॉलेज आणि कॉलेज लाईफनंतरच्या स्ट्रगलची सुंदर कथा आहे. ‘जीव झाला येडा पिसा’ चे विकास पांडुरंग पाटील उर्फ ‘जलवा’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करणार आहेत.
पुढील महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या सिनेमासाठी 19 फेब्रुवारीपासून ऑडिशन सुरू होणार आहे. ऑडिशन : 19, 20, 21 फेब्रुवारी २०२१ या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 7 यावेळेत होणार आहे. इन्फिनिटी ऑफिस, कपिलेश्वर रोड (हाॅटेल सुर्यासमोर) याठिकाणी ऑडिशन्स घेण्यात येणार असून अधिक माहितीकरिता मनोज : 9591032223, अमृता 8904721073 आणि शुभम : 9972772723 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान कलाकारांचे ऑडिशन घेतले जाणार आहेत. निवडण्यात आलेल्या कलाकारांसाठी अभिनय कार्यशाळाही घेण्यात येणार आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बेळगाव शहर आणि आसपासच्या परिसरात करण्यात येणार आहे, असेही विकास पाटील यांनी स्पष्ट केले. बेळगाव परिसरातील नयनरम्य ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाणार आहे.