Monday, November 18, 2024

/

केसात ऊवा होणे-वाचा डॉ सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

ऊवा अर्थात पेडिक्युलस ह्युमॅनस हा समस्त महिल वर्गाचा अगदी पूर्वापार शत्रू आहे. हे लहान चपटे काळेभुरे परोपजीवी लहान मुलींना जास्त त्रासदायक ठरतात. केसांच्या मुळाशी राहून रक्त शोषून त्यांची उपजीविका चाललेली असते. मराठी एक म्हण आहे, अती उवा त्याला खाज नाही आणि अति कर्ज त्याला लाज नाही तर उवा अती प्रमाणात झाल्यास डोक्यात खपल्या धरतात, त्वचा खरखरीत जाड होतो. प्रचंड प्रमाणात खाज सुटते. केस चिकट होतात. उवांची अंडी म्हणजे लिखा केसात चिकटलेल्या दिसून येतात.
कारणे- संपर्कातून उवांचा प्रसार होतो. म्हणजे शाळेत एखाद्या मुलीच्या केसात उवा असतील तर तिच्याबरोबर खेळणार्‍या इतर मुलींनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो. अस्वच्छता, प्रतिकारशक्तीची कमतरता आणि सतत उवा असणार्‍या व्यक्तीशी संपर्क येणे ही कारणे महत्वाची आहेत. शाळा, हॉस्पिटल्स या ठिकाणी उवांचा संसर्ग लवकर होतो.
लक्षणे- सतत खाज पडणे हे महत्वाचे लक्षण आहे. उवा प्रामुख्याने कानाच्या मागे, मानेच्या वर, टाळूवर जास्त प्रमाणात आढळून येतात. लिखा पारदर्शक असून सहसा दिसून येत नाहीत. परंतु अंड्यातून ऊ बाहेर पडल्यावर वरच आवरण केसाला चिकटलेले आढळून येते. क्वचित कोंड्यासारखेच वाटते. उवांच्या संसर्गामुळे डोक्यात लिम्फच्या गाठी येतात. मानेवर, कानाच्या मागे अशा गाठी आढळून येतात. क्वचित कपाळावर, गळ्याकडे बारीक पुरळ येऊन खाज सुटते. उवा सअल्यास अजिबात चैन पडत नाही. आणि हात खाजुमुळे सारखा डोक्याकडे जातो.
उपचार- सगळ्यात प्रथम उपचार म्हणजे स्वच्छता राखणे होय. घरातल्या सगळ्याच व्यक्तींनी स्वच्दतेचे नियम पाळणे जरूरीचे आहे. प्रत्येकाचा टॉवेल, कंगवे, केसाला लावयचे बो, क्लिप्स, साबण, शांपू वेगेवगळाच असावा. ज्या व्यक्तीच्या केसात उवा झालेल्या आहेत त्याची ऊशी, टॉवेल, पांघरून, अंथरूण वेगळेच ठेवावे व धुवावे त्याचे कंगवे आणि ब्रश रोजच्या रोज साबणारच्या व डेटॉलच्या पाण्यात धुवून स्वच्छ ठेवावेत. बारीक दाताचा कंगवा लिखा खरवडून काढण्यासाठी वापरावा.
रॉकेल आणि व्हिनिगर समप्रमाणात घेऊन केसाला 24 तास लावून ठेवावे. त्यानंतर कडकडीत गरम पाण्याने केस धुवून टॉवेलने पुसून घ्यावेत. गरम व्हिनेगरमध्ये बुडवलेल्या कंगव्याने केस विंचरून घ्यावेत. बारीक दाताच्या फणीने लिखा काढाव्यात. अशाने उवाही मरतात. व लिखासुध्दा नष्ट होतात.
आयव्हरमेक्टीन व परमेथ्रीन यांच्या मिश्रणाने शांपू बाजारात उपलब्ध आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावेत. परंतु यामुळे केस गळण्याचा धोका असतो.
केस रोजच्या रोज आणि दिवसातून पाच सहा वेळा विंचरावेत. केस लांब असल्यास डोक्यावरून आंघोळ केल्यावर उदावर कपूरकाचरीची पावडर घालून केस धुपरावेत.

होमिओपॅथी-
एवढे सगळे उपाय करूनसुध्दा जेव्हा उवा होतच राहतात त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे होमिओपॅथी. बारा वर्षाच्या संपदाच्या डोक्यात इतक्या प्रचंड प्रमाणात उवा व्हायच्या की अधेमधे कपाळावर, मानेवर त्या रेंगताना दिसायच्या केसात भरपूर लिखा, अतिशय खाज, संपदाच्या आईने सगळे उपाय करून पाहिले परंतु कोणताही फरक म्हणून नाही. तेव्हा संपदाच्या आईला कोणाकडून तरी समजलं की होमिओपॅथी मध्ये याला प्रभावी औषध आहे. तेव्हा संपदाला विशिष्ट औषध पोटात घेण्यासाठी दिली व आमच्याकडे तयार केलेली ऑईल व शांपू वापरायला दिले. वापरण्याची पधद्तीही सांगितली आणि एकाच महिन्यात उवा लिखांचा संपूर्ण नायनाट झाला, सर्वांगीण स्वच्छता आणि होमिओपॅथी हाच उवांवर खास उपाय आहे.
इतर- शाळेत जाणार्‍या मुलींचे केस एकतर आखूड ठेवावेत किंवा घट्ट वेण्या घालाव्यात. मोकळे केस ठेवल्याने उवांचा प्रसार अधिक लवकर होतो. आठवड्यातून एकदा उवानाशक शांपून केस धुवावेत. शारीरिक स्वच्छतेचे महत्व ओळखावे, टॉवेल, कंगवे साबण वेगळे वापरावेत.Dandruff

कोंडा
केसात कोंडा होणे ही एक सर्वसामान्य बाब झाली आहे. टी. व्ही. वरच्या मजेशीर जाहिराती पाहून तर्‍हेतर्‍हेच्या शांपूचे अभिषेक मस्तकावर करण्यात धन्यता मानली जाते. पण कोंडा तर तसाच राहतो. आणि केस मात्र ऑलक्लिअर किंवा हेडवरचे शोल्डर वर!
संदीप एका मोठ्या औषध कंपनीत व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करतो. मजा म्हणजे त्याची कंपनी अँटीडँड्रफ औषध तयार करते. आणि संदीपला झाला कोंडा! त्यानं स्वत:वर बरेच प्रयोग करुन पाहिले पण परिणाम शून्य. डॉक्टरांकडे स्वत:च्या कंपनीचं डिटेलिंग करताना डॉक्टर त्यालाच उलट विचारणार की बाबा तुझ्या डोक्यातला कोंडा या औषधांनी का बरं कमी होत नाही आणि आम्ही तेच औषध पेशंटना का द्यावं? आता आली का पंचाईत! अर्थातच होमिओपॅथिक घेण्यासाठी तो आमच्याकडे आला. त्याच्या व्यक्तित्वानुसार काही पोटात घेण्याची व वरुन लावण्याची औषधे दिल्यावर कोंडा गायब! शिवाय केस छान सिल्की झाले.
Call us 0831-2431362

त्वचेच्या सर्वात वरच्या म्हणजे बाहेरच्या थरातील पेशी मृत होऊन झडत असतात व त्यांची जागा नवीन पेशी घेतात. हे काम होण्यास महिनाभर लागतो. परंतु कोंडा होणार्‍या व्यक्तिमध्ये 7 दिवसातच हे चक्र पूर्ण होते. त्यामुळे त्या मृतपेशी खरवडल्याप्रमाणे चिकट होऊन केसातच साचत राहतात. यालाच आपण कोंडा किंवा खरवडा म्हणतो.
कारणे व लक्षणे : केस रुक्ष आणि चरबट होतात केसांच्या मुळाशी चिकटपणा जाणवतो. हिमवर्षाव झाल्यासारखे केस दिसू लागतात. वेळीच लक्ष न दिल्यास केस गळणे, खाज पडणे असे त्रास होऊ शकतात. जेव्हा केस विंचरले जातात किंवा केसातून ब्रश फिरवल्यावर कोंडा कातडीपासून वेगळा होतो व हिमकणासारखा खाली पडायला लागतो. कित्येक वेळा कोंड्याचे कण डोळ्यांच्या पापण्या, खांदे अंगावरील कपडे यावरही जमा होतात. कोंड्याचे प्रमाण जास्त असल्यास त्याच्या छोट्या खपल्या केसाच्या मुळाभोवती जमा होतात. त्यामुळे डोके खाजते. कोंड्याचे कण चेहर्‍यावर पडून मुरुम येऊ शकतात.
सर्वसाधारण तब्येत निरोगी नसणे, चुकीच्या आहारविहारामुळे शरीरात निरुपयोगी विषारी पदार्थ तयार होणे, मलाविरोध, बुरशीमुळे होणारे त्वचारोग, प्रतिकाशक्ती कमी होणे यामुळे कोंडा होऊ शकतो. मानसिक ताणतणाव, थंडी, तीव्र शांपूने केस धुणे, शरीराची दमणूक होणे ही सुद्धा कोंड्याची कारणे आहेत.

उपचार
www.drsonalisarnobat.com
होमिओपॅथिक
कोंड्यासाठी सर्वांगीण उपचार होमिओपॅथीमद्वारे करता येतात. मुलार्क व वनस्पती यांचा उपयोग करुन तयार केलेली काही सौंदर्यविषयक उत्पादने आणि पोटात घेण्याची औषधे यांचा मिलाफ कोंड्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. अशी एक पद्धत आम्ही विकसित केलेली आहे. तर पाहूया काही औषधांची माहिती.
बिंका मायनर : केस चिकट, गुंता होतो. केसांच्या मुळाशी घट्ट मळ साचतो. चिकट कोंडा असतो.
सल्फर : त्वचाविकार असतात. डोक्यात प्रचंड खाज असते. त्वचा रुक्ष कोरडी, आग पडते. लालसर पुरळ डोक्यात आढळतात. बारीक पावडरीसारखा कोंडा.
याशिवाय अर्निका, अझरडॅक्ट इंडिका अशी औषधे पोटात घेण्यासाठी वापरता येतात.
निसर्गोपचार : मेथी दाण्यांची पेस्ट, लिंबू, पांढरे बीट, पडवळ यांचा रस कोंड्यासाठी उपयुक्त ठरतो.
इतर : आहार संतुलित असावा. केस व डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे केसांच्या मुळाशी मृत पेशी साठत नाहीत. केस ब्रशच्या सहाय्याने भरपूर विंचरावेत. त्यामुळे मुळाशी रक्ताभिसरण वाढून केसाखालील त्वचेचे आरोग्य सुधारते. चपचपीत तेल लावू नये. फक्त केस साधारण मऊ होतील इतपतच केसांना तेल लावावे.
समतोल आहार, योग्य विश्रांती यामुळे आरोग्य सुधारते व कोंडा कमी होण्यास मदत होते.
9916106896
9964946918

 

https://www.facebook.com/375504746140458/posts/1320582201632703/

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.