कर्नाटक लोकसेवा आयोगातर्फे (केपीएससी) राज्यातील विविध सरकारी खात्यांमधील सहाय्यक आणि प्रथमदर्जा सहाय्यक पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्राच्या 200 मी. परिघामध्ये 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी असणार आहे.
कर्नाटक लोकसेवा आयोग बेंगलोरतर्फे राज्यातील विविध सरकारी खात्यांमधील सहाय्यक आणि प्रथमदर्जा सहाय्यक पदांसाठी रविवार दि. 28 फेब्रुवारी 2019 रोजी स्पर्धात्मक परीक्षा घेतली जाणार आहे. बेळगाव शहरातील 60 परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. या परीक्षा केंद्रांवर रविवारी कडक पोलिस बंदोबस्त असणार असून परीक्षा केंद्राच्या 200 मीटर अंतराच्या परिसरात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश लागू असणार आहे, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. बेळगाव शहरातील परीक्षा केंद्रांची नांवे खालील प्रमाणे आहेत.
नॅशनल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन ट्रस्ट इंग्लिश मीडियम हायस्कूल क्लब रोड बेळगाव, कन्नड मिडीयम हायस्कूल महांतेशनगर, बी. के. मोडेल हायस्कूल कॅम्प, सेंट पॉल हायस्कूल कॅम्प, लिटिल स्कॉलर अकॅडमी हायस्कूल रामतीर्थनगर, उदय इंग्लिश मीडियम हायस्कूल रामतीर्थनगर, ठळकवाडी हायस्कूल टिळकवाडी, ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वैभवनगर, सेंट अन्थोनी कन्नड हायर प्रायमरी स्कूल खानापूर रोड कॅम्प, संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल अनगोळ, डिव्हाइन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूल टिळकवाडी, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल कॅम्प, शर्मन कन्नड हायस्कूल, गोमटेश हायस्कूल हिंदवाडी, वनिता विद्यालय हायस्कूल कॉलेज रोड, केएलएस इंग्लिश मिडीयम हायस्कूल टिळकवाडी, महिला विद्यालय हायस्कूल, बालिका आदर्श हायस्कूल, गजाननराव भातकांडे इंग्लिश मीडियम हायस्कूल, एसएस कॉम्पोझिट कॉलेज शिवबसवनगर, कनक मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल नेहरूनगर, इस्लामिया कंपोझिट कॉलेज कॅम्प, अंजुमन इंग्लिश मिडीयम हायस्कूल बेळगाव, राणी पार्वतीदेवी कॉलेज टिळकवाडी, जैन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पिरनवाडी, बेननस्मिथ हायस्कूल कॅम्प, सेंट झेवियर्स हायस्कूल कॅम्प, हेरवाडकर हायस्कूल टिळकवाडी, डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूल फोर्ट रोड, जी. ए. कॉम्पोझिट कॉलेज कॉलेज रोड, श्रीमती उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल पाटील गल्ली, गव्हर्मेंट सरदार हायस्कूल काकतीवेस, गोगटे पियू कॉलेज टिळकवाडी, महावीर पीयु कॉलेज नेहरूनगर, गव्हर्मेंट सरदार्स पियू कॉलेज काकतीवेस,
शेख कॉलेज ऑफ एज्युकेशन नेहरूनगर, आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक शिवबसवनगर, शेषगिरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग उद्यमबाग, राणी पार्वतीदेवी पियू कॉलेज टिळकवाडी, ठळकवाडी हायस्कूल टिळकवाडी, एमएमएस कॉम्पोझिट पियू कॉलेज चव्हाट गल्ली, वनिता विद्यालय हायस्कूल, बिके मोडेल हायस्कूल कॅम्प, अंजुमन आर्ट अँड कॉमर्स कॉलेज, बेननस्मिथ मेथोडिस्त डिग्री कॉलेज कॅम्प, बिके मोडेल हायस्कूल कॅम्प, महावीर मिरजी कॉलेज ऑफ कॉमर्स नेहरूनगर, शरमन इंग्लिश मिडीयम हायस्कूल बेळगाव,
बाशिबान हायस्कूल भेंडीबाजार, महिला विद्यालय कॉलेज रोड, मराठा मंडळ आर्ट, कॉमर्स, सायन्स अँड होम सायन्स कॉलेज, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल लक्ष्मीटेकडी गणेशपुर, केएसआर कॉलेज ऑफ एज्युकेशन नेहरूनगर, सेव्हन्थ डे एडव्हटिस्ट हायस्कूल आझमनगर, वसंतराव पोद्दार पॉलीटेक्निक कॉलेज टिळकवाडी, ज्योती सेंट्रल स्कूल कॅम्प आणि शेख सेंट्रल स्कूल नेहरूनगर.