Saturday, January 4, 2025

/

किणये घाटात लुटारूंची दहशत : ट्रक लुटण्याचा झाला प्रयत्न

 belgaum

बेळगाव -चोर्ला मार्गावरील किणये घाटात वाहने अडवून लुटणाऱ्या लुटारूंनी पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. बेळगावहून गोव्याला जाणाऱ्या मालवाहू वाहनाच्या दोऱ्या व ताडपत्री कापून वाहनातील लांबविण्याचा प्रयत्न लुटारूंनी केल्याची घटना गुरुवारी रात्री 11.20 च्या सुमारास किणये घाटात घडली.

बेळगावहून गोव्याला जाणारे मालवाहू ट्रक, टेंपो आदी वाहनांच्या दोऱ्या कापून माल पळविण्यासाठीचे प्रयत्न सुरूच आहेत. किणये ओलांडल्यानंतर घाटाचा चढाव लागतो. या ठिकाणी चढतीला वाहनांचा वेग कमी होतो हीच संधी साधून सशस्त्र लुटारू वाहनांच्या मागील दोऱ्या कापून माल लुटण्याचा प्रयत्न करतात. गेल्या तीन महिन्यांमध्ये असे तीन प्रकार घडले आहेत. किणयेपासून उचवडे क्रॉसपर्यंत सशस्त्र टोळीने अक्षरशः दहशत माजवली आहेत.

गुरुवारी रात्री एपीएमसी भाजी मार्केटमध्ये भाजी भरून तीन ट्रक गोव्याला निघाले होते. घाटातील वळणे आणि गतिरोधकांमुळे एका ट्रकचा वेग कमी होताच तीन लुटारू त्या ट्रकवर चढले त्यांनी पाठीमागील दोऱ्या कापून आत प्रवेश केला. मात्र वाहनात फक्त भाजीपाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान एका वाहनाच्या दोर्‍या कापण्याचा प्रकार पाठीमागच्या वाहनचालकाला लक्षात येताच त्याने हॉर्न वाजवून समोरच्या वाहनचालकाला सतर्क केले. त्यामुळे थोड्या अंतरावर जाऊन वाहने उभी करून चालक व क्लिनर यांनी टॉमी, लोखंडी सळी आदी अवजारे घेऊन लुटारूंना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोरी कापणारे लुटारू अंधाराचा फायदा घेऊन फरारी झाले, जाता जाता लुटारूंपैकी एकाने प्रतिकार करणाऱ्या चालक व क्लिनरच्या दिशेने वेळा फेकून मारला. संबंधितांनी तो विळा पोलीस अधिकार्‍यांकडे सोपविला आहे.

वाहने लुटण्याचा प्रयत्न झाला तेथून काही अंतरावर सुमारे 15 ते 20 जण उभे होते. त्यांनी या मालवाहू वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केली. दगडफेक वाढताच घाबरलेल्या चालक व क्लिनर अणि आपल्या वाहनांसह तात्काळ गोव्याचा रस्ता धरला. सदर घटनेनंतर 112 क्रमांकाशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. त्यानंतर तब्बल तासाभराने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत लुटारूंच्या सशस्त्र टोळीने तेथून पळ काढला होता. एका क्लिनरने दिलेल्या माहितीनुसार अंधारात दबा धरून बसलेल्या लुटारूंकडे कुऱ्हाड, चाकू, विळे, काठ्या आदी शस्त्रे होती. सदर घटनेची पोलिसात नोंद झाली असून पोलीस लुटारूंच्या शोध घेत आहेत

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.