वरेरकर नाट्य संघ व के बी कुलकर्णी कलादालना तर्फे चित्र महर्षी के.बी.कुलकर्णी यांची जयंती साजरी करण्यात आली . या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या के.बी.कुलकर्णी आणि त्यांच्या शिष्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उदघटन किरण ठाकूर , नामानंद मोडक आणि चंद्रकांत जोशी यांच्या हस्ते करण्यात आले .या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चंद्रकांत जोशी तर उदघाटक म्हणून किरण ठाकूर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून नामानंद मोडक उपस्थित होते. प्रभा कुलकर्णी यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.
गेल्यावर्षी ललित अकादमी अध्यक्ष डॉ.उत्तम पाचारणे यांनी ऑन द स्पॉट पेंटिंग करणाऱ्या कलाकारांना पाच हजार रुपये बक्षीस जाहीर केले होते त्याचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
भारतीय चित्रकला ,शिल्पकला या पार्थिव कला आहेत. इतर संगीत नाट्य इत्यादी कला क्रियाशील कला आहेत त्यांचा सहज आस्वाद घेता येतो. सुरुवात झाली की रसास्वाद घेऊ शकतो पण चित्र-शिल्प पूर्ण झाल्याशिवाय त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही. समाजाला आर्टिस्ट जरुरी आहे पण तो केवळ ड्रॉइंग करणारा आर्टिस्ट नको सोशल आर्टिस्ट हवा. कले च्या निर्मितीतून आत्मिक आनंद मिळतो .
नवसृजनातून आनंद ,समाधान मिळते. चित्र आणि संगीत आपापल्या जन्मापासूनच कळू लागते कारण त्याबाबत इच्छा संवेदना अत्स्फूर्तीतुन येत असतात. कला ही आतून बाहेर येणारी गोष्ट आहे तर विद्या ही गोष्ट बाहेरून आत जात असते असे विचार ज्येष्ठ दिग्दर्शक आणि चित्रकार चंद्रकांत जोशी यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
चित्र प्रदर्शनात के.बी.कुलकर्णी,रवी परांजपे,मारुती पाटील,जॉन फर्नांडिस,विकास पटणेकर,किरण हणामशेत ट,सुजाता बेळवी यांच्या चित्रांचा समावेश आहे.वृषाली मराठे यांनी सूत्रसंचालन केले तर जगदीश कुंटे यांनी आभार मानले.