गुगल पे, फोन पे यासारख्या मोबाइल वॉलेटमधून विजेचे बिल भरणाऱ्या नागरिकांना तांत्रिक कारणामुळे बिल भरण्यात समस्या निर्माण होत असल्याने ऑनलाइन बिल भरण्याची सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे.
डिजिटल इंडियामुळे ऑनलाइन बिल भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक जण आपल्या मोबाईलवरुन विजेचे बिल भरत आहेत. गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा मोबाईल वॉलेटमधून बिल भरण्यात येत आहे.
मात्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मोबाइल वॉलेटद्वारे बील भरताना समस्या येऊ लागल्या असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याआधी प्रत्येक महिन्याचे रिडींग केल्यानंतर मोबाईलद्वारे त्याची माहिती ग्राहकाला मिळत होती. परंतु या महिन्यात ही माहिती उपलब्ध झाली नाही. बिल क्रमांक घातला तरी ते भरले जात नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. त्यामुळे ही तांत्रिक समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान गुगल पे, फोन पे या दोन मोबाइल वॉलेटमध्ये अडचणी येत असल्या तरी अन्य मार्गाने वीज बिल भरता येऊ शकते. पेटीएम वर बिल भरता येऊ शकते.
त्याचप्रमाणे हेस्काॅमच्या बिल भरणा केंद्रावर अथवा हेस्काॅम वेबसाईटवर जाऊन विज बिल करता येऊ शकते, अशी माहिती सहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करुर यांनी दिली आहे.