बेळगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना आता वीस घरे मंजूर करण्यात आली आहेत. यासंबंधीचा आदेश प्रत्येक जिल्हा पंचायतीला राज्य सरकारने पाठविला आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आणि राज्य सरकारच्या बजेट नंतर या घरांना मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामुळे मागील चार वर्षांपासून एकही वसतिगृह मंजूर न झाल्याने संतापलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आता नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली आहे. दरम्यान तातडीने अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये ग्रामपंचायतींना वीस घरे मंजूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. याची निवड प्रक्रिया तातडीने संबंधित ग्रामपंचायतींना पाठविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आले आहेत. याकडे सर्व सदस्यांचे नजरा लागून राहिल्या होत्या.
आता ग्रामपंचायतींना 20 घरे मंजूर करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत असली तरी ही निवड प्रक्रिया कोणत्या पद्धतीने होणार याकडेही गरीबांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. यापुढे गरिबांना घरे मिळावी अशी आशाही व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान पूर परिस्थितीत कोसळलेल्या घरांचा निधी आला नसला तरी आणि अनेक वसतिगृहांची कामे अर्धवट असल्याने आता पुन्हा नव्याने मंजूर झालेल्या घरांची ही निधी विना अशी अवस्था होणार का हा प्रश्नही अनेकांसमोर पडला आहे. त्यामुळे निवड प्रक्रियेनंतर तातडीने घरांसाठी मंजूर झालेला निधी द्यावा अशी मागणी व्यक्त करण्यात येत आहे.