बेळगाव आणि परिसरात प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने खानापूर तालुक्यात एका जखमी गरुडाला जीवदान दिले आहे.
खानापूर तालुक्यातील निसर्ग धाब्याचे संचालक मायकेल नोरोन्हा यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलशी संपर्क साधला. आपल्या धाब्यासमोरील परिसरात एक गरुड जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
ताबडतोब फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांशी संपर्क साधून सदर बातमी कळविली. बावा या संस्थेचे वरुण कारखानीस आणि फेसबुक संस्थेचे सदस्य त्याठिकाणी पोहोचले. वरुण कारखानीस यांनी जखमी गरुडावर प्रथमोपचार करून वनविभागाकडे सुपूर्द केले.
वनविभागाचे शिवानंद मगदूम, विनय गौडर, मल्लिकार्जुन जोतेन्नावर, एम. ए. किल्लेदार, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर, बावा संस्थेचे वरुण कारखानीस यांनी या गरुडाला वाचविण्यासाठी परिश्रम घेतले.
शहर आणि परिसरातील कोणत्याही ठिकाणी अशा घटना घडल्यास, मदतीसाठी 9986809825 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.