स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निर्माण करण्यात येत असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामकाजाची पाहणी आज विविध विभागातील अधिकाऱ्यांनी केली. मध्यवर्ती बसस्थानकाच्या ठिकाणी आज पोलीस विभाग, स्मार्ट सिटी, महानगरपालिका अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
गुरुवारी (दिनांक १८) कामकाज सुरु असलेल्या ठिकाणी डीसीपी डॉ. विक्रम आमटे, स्मार्ट सिटी संचालक शशिधर कुरेर, पालिका आयुक्त जगदीश के. एच., मार्केट एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कंत्राटदाराला हे कामकाज लवकरात लवकर पूर्ण करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या.
बेळगाव आणि आसपासच्या परिसरात सुलभ रहदारीची व्यवस्था होण्यासाठी हे कामकाज हाती घेण्यात असून या कामकाजाची पाहणी पोलीस विभाग, स्मार्ट सिटी, महानगरपालिका आणि विविध विभागातील अधिकाऱ्यांनी केली.
बसस्थानकाच्या आसपास कोणत्या ठिकाणी कोणती व्यवस्था असावी, बसस्थानक परिसरात रहदारीसाठी सुलभ व्यवस्था कशी असावी, रिक्षा स्थानक कुठे असावे, यासह इतर अनेक व्यवस्थेच्या विषयी अधिकाऱ्यांनी चर्चा केली.
यासंदर्भात प्रवासी मंदिरात अधिकाऱ्यांची सभाही पार पडली. या सभेत जिल्हापातळीवरील अधिकारी उपस्थित होते.