बेळगाव शहरातील उद्यमबाग, टिळकवाडी आणि शहापूर पोलिस स्थानक कार्यक्षेत्रात रहदारी आणि पार्किंग नियमांचे उल्लंघन रोखून नजर ठेवण्यासाठी सिटी सर्व्हिलन्स सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून यासाठी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने निविदा काढल्या आहेत.
सदर निविदा अंतर्गत सिटी सर्व्हिलन्स कॅमेरे, रहदारी नियम उल्लंघनावर लक्ष ठेवणारे कॅमेरे आणि पार्किंग अंमलबजावणी कॅमेऱ्यांचा एकत्रित पुरवठा आणि उभारणी करणे. उद्यमबाग, टिळकवाडी आणि शहापूर पोलीस स्थानकामध्ये निरीक्षण प्रणाली (मॉनिटरिंग सिस्टिम) स्थापन करणे.
याखेरीज आयसीसीसी आणि रहदारीवर लक्ष ठेवणारे केंद्र बेळगाव शहरात उभारणे. त्याचप्रमाणे ही सर्व केंद्रे एकमेकांशी समाप्ती ते शेवटपर्यंत पर्याप्त उपायांसह जोडली गेलेली असतील याची दक्षता घेणे. या संपूर्ण यंत्रणेच्या चांगलेपणाची 5 वर्षाची हमी देणे, आदी बाबींचा समावेश आहे.
कॅमेरे आणि अन्य संबंधित साहित्य वितरणाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल. वर्कऑर्डर मिळाल्यानंतर 3 महिन्यात प्रकल्पस्थळी वितरण. यंत्रणा उभारणे आणि ती कार्यान्वित करण्यासाठी 6 महिन्याचा तसेच संगणक पद्धतीने यंत्रणेचे एकत्रीकरण करण्यासाठी आणखी 3 महिन्याचा असा एकूण 9 महिन्याचा कालावधी.
या पद्धतीने रहदारी आणि पार्किंगवर लक्ष ठेवण्यासाठी उद्यमबाग, टिळकवाडी आणि शहापूर पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात एकूण 156 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.