कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या मराठा प्राधिकरण मंडळाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन नामकरण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे बेळगाव जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
मराठा समाज आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक पातळीवर खूप मागे आहे. या समाजाचा प्राधिकरणांतर्गत विकास व्हावा. तसेच या प्राधिकरण मंडळाचे नाव मराठा विकास प्राधिकरण ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज प्राधिकरण असे करण्यात यावे.
याचप्रमाणे मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा : बेळगाव विभागातर्फे करण्यात आली आहे.
सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या शिलेदारांकडे सुपूर्द करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बेळगाव जिल्हाध्यक्ष राजू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जोतिबा पाटील, राज्य कार्यदर्शी के. जी. पाटील, राज्य सदस्य दुर्गेश मैत्री, जिल्हा कार्यदर्शी अमोल देसाई, प्रवक्ते मुनीर लतीफ, संजय कोलकर, शिवाजी लाड, धनपाल अ गशीमनि यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले.