अनेक व्याघ्र अभयारण्यांना जोडले गेलेले आणि जगामध्ये भारतातील “वाघांची राजधानी” म्हणून सुपरिचित असलेले नागपूर हे आता स्टार एअरच्या विमान सेवेद्वारे थेट बेळगावशी जोडले जाणार आहे.
यासंदर्भात प्रश्नचिन्हासह “ओळखा आमचे आगामी गंतव्य अर्थात मुक्कामाचे ठिकाण” या उपशीर्षकाखाली स्टार एअरने एक चित्र प्रसिद्ध केले आहे. ज्यामध्ये संबंधित ठिकाण संत्र्यासाठी प्रसिद्ध असून ज्याच्या चोहोबाजूला व्याघ्र अभयारण्य असल्याचे नमूद केले आहे.
यावरून हे ठिकाण नागपूर असल्याचे स्पष्ट होते आणि बहुदा येत्या मार्च 2021 मध्ये या ठिकाणी विमानसेवा प्रारंभ होण्याची शक्यता आहे. उड्डाण तीन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 13 हवाई मार्गांपैकी सध्या 12 मार्गांवर हवाई वाहतूक सुरू आहे. जयपुरबाबत स्टार एअरकडून घोषणा होणे बाकी आहे.
जेंव्हा नागपुर विमान सेवेची घोषणा होईल, त्यावेळी बेळगाव एकूण 14 शहरांची थेट विमान सेवेद्वारे जोडले जाणार आहे. यामुळे एखाद्याला बेळगावहून थेट हैदराबाद, बेंगलोर, इंदोर, पुणे, म्हैसूर तिरुपती, कडप्पा, सुरत, अहमदाबाद, मुंबई, नाशिक, चेन्नई, जोधपूर व नागपूरला जाता येणार आहे.
बेळगावसाठी उडान 3.0 योजनेअंतर्गत मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. बेळगाव ते हैदराबाद -इंटर ग्लोब (इंडिगो) स्पाइस जेट, टर्बो मेघा (ट्रू जेट). बेळगाव ते तिरुपती -घोडावत (स्टार एअर), टर्बो मेगा (ट्रु जेट). बेळगाव ते मुंबई -स्पाइस जेट, घोडावत (स्टार एअर). बेळगाव ते पुणे -अलाईन्स एअर. बेळगाव ते सुरत -घोडावत (स्टार एअर) बेळगाव ते कडप्पा -टर्बो मेघा (ट्रू जेट). बेळगाव ते म्हैसूर -टर्बो मेघा (ट्रू जेट). बेळगाव ते इंदोर -घोडावत (स्टार एअर). बेळगाव ते जोधपुर -घोडावत स्टार फेब्रुवारी 16 रोजी घोषणा. बेळगाव ते अहमदाबाद -घोडावत (स्टार एअर).बेळगाव ते ओझर (नाशिक) -घोडावत (स्टार एअर). बेळगाव ते नागपूर -घोडावत स्टार एअर मार्च 2021 मध्ये घोषणेची शक्यता. बेळगाव ते जयपूर -घोडावत (स्टार एअर) अद्याप नाही.