मंगळवार दिनांक १९ जानेवारी रोजी जिल्हा पंचायतीच्या सभागृहात सामान्य स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करून आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी विकास योजना राबविण्यात येत आहेत. या कामाचा दर्जा आणि खोळंबलेले कामकाज लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.
विकासकामांच्या चर्चेसोबतच शिक्षण आणि आरोग्य बाबत सुविधांच्या पूर्ततेबाबत चर्चा करण्यात आली. सरकारने अनेक शैक्षणिक आणि आरोग्य विषयक असलेल्या सरकारी योजना अंमलात आणल्या असून या योजना लवकरात लवकर जनतेपर्यंत पोहोचाव्यात, यासंबंधीही चर्चा या बैठकीत करण्यात आली. शिक्षण आणि आरोग्य सुविधेच्या पूर्ततेबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.
या बैठकीला स्थायी समितीचे अध्यक्ष अरुण कटांबळे, सदस्य महांतेश मगदूम, सरस्वती पाटील, सिद्धू नराटे, सुदर्शन खोत यांच्यासह, अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.