Friday, December 20, 2024

/

पीसीओडी समस्या आणि त्यावरील उपाय

 belgaum

पीसीओडी समस्या आणि त्यावरील उपाय (What Is PCOD
आजकाल महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या दिसून येत आहेत. मासिक पाळी अनियमित असण्यापासून ते अर्ली मॅनोपॉजपर्यंत अनेक समस्यांना महिलांना सामोरं जावं लागतं. काही वर्षांपासून पीसीओडी ही समस्यादेखील मोठ्याप्रमाणावर डोकं वर काढू लागली आहे. बऱ्याचदा मुलींची मासिक पाळी अनियमित होत असेल तर त्याचे कारण पीसीओडी असे सांगण्यात येते. यासाठीच पीसीओडीबाबत सर्व गोष्टी प्रत्येक स्रीला माहित असणं गरजेचं आहे.
पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसिज (Polycystic Ovarian Disease) पीसीओडी या आरोग्य समस्येमध्ये त्या स्त्रीच्या अंडाशयामध्ये गाठी अथवा सिस्ट निर्माण होतात. पीसीओडी हा महिलांमधील एक इन्डोक्राईन विकार आहे.

अंडाशयातील सिस्टमुळे त्या महिलेचे स्त्रीबीज निर्माण होण्यात अडथळा निर्माण होतो. एका शारीरिक कार्यात अडथळा आल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण शारीरिक कार्यावर होऊ लागतो. पीसीओडीमुळे महिलांच्या हॉर्मोन्समधील संतुलन बिघडते आणि त्यांना हॉर्मोनल असंतुलनाला सामोरे जावे लागते. साधारणपणे मासिक पाळी सुरू झालेल्या किशोरवयीन मुलींपासून अगदी मनोपॉजपर्यंतच्या म्हणजेच पन्नासीच्या वयोगटातील सर्व महिलांना पीसीओडी या समस्येला सामोरे जावे लागू शकते. सध्या वंधत्वाचा सामना करणाऱ्या अनेक महिलांमध्ये पीसीओडी हे आई न होण्यामागील प्रमुख कारण आहे. अनेक मुली मासिक पाळी अनियमित असेल तर त्यावर वेळीच उपचार करीत नाहीत.
ज्यामुळे भविष्यात त्यांना वंधत्वाला सामोरे जावे लागेल. आजकालच्या आधूनिक काळात पीसीओडीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना उपलब्ध आहेत. शिवाय जीवनशैलीमध्ये काही विशिष्ठ बदल करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला पीसीओडीची समस्या आहे हे वेळीच लक्षात येणं गरजेचं आहे. मात्र अनेक जणींना याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. उपचार करण्यासाठी उशीर झाल्यास त्याचे भयकंर परिणाम भोगावे लागू शकतात. यासाठी आम्ही तुम्हाला पीसीओडीची लक्षणे, कारणे आणि उपचार पद्धती सांगत आहोत ज्यांचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.
पीसीओडीची समस्या समजून घेण्यासाठी त्याआधी तुम्हाला त्याची काही लक्षणे माहीत असणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्हाला या समस्येवर पटकन उपचार करता येतात.
अचानक वजन वाढू लागणे (Weight Gain)

पीसीओडीची समस्या असल्यास महिलांच्या वजनामध्ये अचानक वाढ होऊ लागते. अशा महिलांच्या पोटाचा घेर नेहमीपेक्षा जास्त दिसू लागतो. आजकाल अनेक महिलांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. त्यामुळे तुमचे वजन अचानक वाढू लागले असेल तर त्याकडे दूर्लक्ष करू नका.
अनियमित मासिक पाळी (Irregular Menstrual Cycle)
दर महिन्याला स्रीयांच्या गर्भाशयातून एक परिपक्व झालेले स्त्रीबीज बाहेर पडते. यालाच मासिक पाळी अथवा ऋतूस्त्राव असे म्हणतो. मात्र पीसीओडीमुळे स्त्रीबीज निर्माण होण्यास अडथळा येतो. सहाजिकच त्यामुळे मासिक पाळीची समस्या निर्माण होते. मासिक पाळी उशीरा येणे अथवा मासिक पाळीत अपुरा रक्तस्त्राव होत असेल तर याबाबत वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या.
मासिकपाळी सुरू असताना असह्य वेदना होणे
पीसीओडीमुळे स्त्रीयांच्या अंडाशयात गाठी निर्माण होतात. ज्यामुळे मासिक पाळीच्या काळात त्यांना असह्य वेदना जाणवू लागतात. मासिक पाळीच्या काळात नेहमीपेक्षा तीव्र वेदना जाणवत असतील तर त्याबाबत तुमच्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला अवश्य घ्या. पीसीओडीच्या समस्येमुळे अनेकींना मासिक पाळी सुरू नसतानादेखील कोणत्याही कारणाशिवाय पोटात वेदना जाणवतात. काहीजणींना पीसीओडीच्या समस्येमुळे योनीमार्गामध्ये मासिक पाळी सुरू नसतानाही असह्य वेदना जाणवतात.

Pcos health tips
डोकेदुखी (Headache)
शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांचा परिणाम तुमच्या शरीरातील इतर अवयवांवरदेखील होतो. पीसीओडीची समस्या असल्यास काहीजणींना अचानक तीव्र डोकेदुखीला सामोरं जावं लागतं.
वंधत्व (Infertility)
पीसीओडी हे महिलांमधील वंधत्वाचे एक प्रमुख कारण आहे. गर्भधारणा राहण्यासाठी ओव्हूलेशन होण्याची गरज असते. मात्र ओव्हूलेशनच्या कार्यात अंडाशयातील गाठींमुळे अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे महिलांचे आई होण्याचे स्वप्न भंगू शकते.
अशक्तपणा (Weakness)
पीसीओडीचा स्त्रीयांच्या संपूर्ण आरोग्यावर विपरित परिणाम होतो. हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा आल्यामुळे महिलांना हॉर्मोनल असंतूलनाला सामोरे जावे लागते. ज्यामुळे त्यांना सतत कंटाळवाणं आणि थकल्यासारखं वाटू लागतं.
केस गळणे (Hair Loss)
हॉर्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या केसांवरही होतो. केसांचे योग्य पोषण न झाल्यामुळे ते कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. शिवाय या काळात केस मोठ्या प्रमाणावर गळतात. हॉर्मोन्स असंतुलनामुळे तुमचे केस गळत असल्यामुळे यावर बाह्य उपचार करण्यापेक्षा पीसीओडीवरील उपचार करणे गरजेचे आहे. यासाठी केस मोठ्या प्रमाणावरगळत असतीत तर तुमची संपूर्ण वैद्यकीय चाचणी अवश्य करून घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.