बेळगाव जिल्ह्याला पुन्हा एक मंत्रीपद मिळाले असून जिल्ह्यातील प्रभावी नेते उमेश कत्ती आता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारातील नव्या मंत्र्यांची यादी आज राजभवनात झळकली. उमेश कत्ती, एमटीबी नागराज, आर. शंकर, अरविंद निंबावळी, एस. अंगार, मुरुगेश निराणी आणि सी. बी. योगेश्वर हे आता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
गेल्या कित्येक महिन्यापासून उमेश कत्ती यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही? याची चर्चा होत होती. याबद्दल मध्यंतरी उमेश कत्ती यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर दबाव देखील आणला होता. मात्र आज अखेर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
नव्या मंत्र्यांच्या नांवावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राजभवनात आज बुधवारी सायंकाळी हे सर्व मंत्री गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.
एकंदर मंत्रिमंडळ विस्ताराला सध्याचा संक्रांतीचा मुहूर्त लागला असेच म्हणावे लागेल. दरम्यान, आता एकट्या बेळगाव जिल्ह्यामध्ये रमेश जारकीहोळी, शशिकला जोलले, उमेश कत्ती, सिद्धगौडा पाटील, श्रीमंत पाटील आणि लक्ष्मण सवदी असे पाच मंत्री असणार आहेत.