दीर्घकाळ मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले बेळगाव जिल्ह्यातील प्रभावी राजकीय नेते उमेश कत्ती यांनी आज अखेर मंत्रीपदाची शपथ घेतली.
बेंगलोर येथे राजभवनामध्ये आज सायंकाळी राज्यपालांनी नवनिर्वाचित मंत्री उमेश कत्ती यांना गोपनियतेची शपथ देवविली. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये उमेश कत्ती यांच्याप्रमाणे एटीबी नागराज आणि अरविंद लिंबावळी यांना देखील स्थान मिळाले आहे. राज्याच्या या मंत्रिमंडळात एकंदर सात जणांना नवे मंत्रीपद देण्यात आले आहे. या सात जणांमध्ये उपरोक्त तिघांसह मुरुगेश निराणी, एस. अंगार, आर. शंकर आणि सी. बी. योगेश्वर यांचा समावेश आहे.