Friday, January 3, 2025

/

२४ तास पाणी योजनेसाठी संपूर्ण सहकार्य : नगरविकास मंत्री महानगरपालिका

 belgaum

२४ तास पाणी योजना ही शहरातील जनतेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष काळजी घेतली पाहिजे, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना नगरविकास मंत्री बी. ए. बसवराज यांनी दिल्या आहेत.

महानगरपालिकेच्या सभागृहात शुक्रवारी प्रगती आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. निरंतर पाणी योजना सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत पाऊले उचलली जातील, या योजनेवर त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी सरकार संपूर्णपणे सहकार्य करेल, असे आश्वासन बी. ए. बसवराज यांनी दिले.

कचरा उचल करण्यासाठी अंमलात आणण्यात आलेले आरएफआयडी टॅग्ज योग्यरितीने काम करत नाहीत, यावर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. याविरोधात संबंधितांवर कडक कारवाई करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.Ccb meeting

याविषयीचा आढावा घेऊन अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा विल्हेवाट लावण्याची व्यवस्था मुबलक असणे आवश्यक आहे असे सांगितले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना त्यांनी दिली.

याव्यतिरिक्त मार्चअखेरपर्यंत 100 टक्के सक्तीची मालमत्ता कर वसूल करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पिण्यासाठी मुबलक पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदीप आणि इतर मूलभूत सुविधा पुरविण्याकडे योग्य पद्धतीने लक्ष पुरविण्याची सूचनाही त्यांनी दिली. निष्काळजीपण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मंत्री बसवराज यांनी दिला.

या बैठकीला अनिल बेनके, केयूडब्ल्यूसी संचालक दीपा कुडची, बुडा अध्यक्ष घोळाप्पा होसमनी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पालिका आयुक्त जगदीश के. एच. बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.