जिलेटीन स्फोटक वस्तू जप्त
शिमोगा जिल्ह्यातील हुनसुडी गावात जिलेटीन स्फोट होऊन अनेक जण ठार झाल्याची घटना ताजी असताना आंतरिक सुरक्षा पोलीस दलाने जिलेटीन स्फोटक वस्तू जप्त केल्या आहेत.
गोकाक तालुक्यातील कुलगोड पोलीस स्थानक व्याप्तीतील मंनिकेरी गावातील व्याप्तीत जिल्हा अंतरिक सुरक्षा विभागाच्या पोलीस दलाने पेट्रोलिंग करताना ट्रॅक्टर मध्ये जिलेटीन वस्तू नेताना उघडकीस येताच या स्फोटक वस्तू जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली असून त्याच्या जवळील 49 जिलेटीन काड्या 23ई डी केबल आणि एक ब्लास्टर, बॅटरी जप्त केले आहे.