हलगा येथील लक्ष्मी मंदिरात चोरीचा प्रकार उघडकीस आला असून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
रात्री मंदिर आवारातील लाईट्स बंद असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी देवीचे साधारण अडीज तोळ्यांचे दागिने लंपास केले आहेत.बेळगाव तालुक्यातील मंदिरे चोरट्यांनी लक्ष केली आहेत पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ध्या तोळ्याची बोरमाळ, 2 तोळ्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची नथ असे एकूण 1 लाखाहून अधिक किंमत असलेले दागिने चोरीस गेले आहेत.
मंदिराचे प्रवेशद्वार फोडून गाभाऱ्याचा दरवाजा फोडून हे कृत्य करण्यात आले आहे.
सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मंदिराचे पुजारी नेहमीप्रमाणे मंदिरात पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. घटनास्थळी हिरेबागेवाडी पी एस आय पठाण यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.