स्वर मल्हार आयोजित संगीत मैफलीत दोन तरुण गायकांनी आपल्या गायकीने उपस्थित संगीत प्रेमिंची दाद मिळवली.
प्रारंभी देवरूख येथील कुणाल भिडे यांनी
मधुवंती रागातील विलंबित एकतालातील ‘श्याम भई’ ही पारंपरिक बंदिश आणि त्यानंतर द्रुत त्रितालातील ‘काहे मान करो’ ही बंदिश सादर केली. ‘पद्मनाभा नारायणा’ हा अभंग गाऊन कुणाल भिडे यांनी आपल्या गायनाची सांगता केली .त्यांना संतोष पुरी यांनी तबला आणि योगेश रामदास यांनी संवादिनी साथ दिली.
त्यानंतर महेश कुलकर्णी यांनी राग श्री मधे ‘ लगत सांझ उदास’ ही झपतालातील बंदिश आणि ‘पार न लागी’ ही द्रुत त्रितालातील बंदिश सादर केली.
त्यांनतर हमीरकेदार या जोड रागातील एक बंदिश अतिशय तयारीने सादर केली. त्यालाच जोडून ‘मत बनावो बनन जावो सैया’ ही केदार रागातील बंदिश पेश केली.त्यानंतर एक ‘वो गझल वालोंका’ ही उर्दू गझल सादर केली.
त्यांना सारंग कुलकर्णी यांनी संवादिनी आणि संतोष पुरी यांनी तबला साथ केली.प्रारंभी प्रभाकर शहापुरकर, अर्चना बेळगुंदी,महेश कुलकर्णी आणि कुणाल भिडे यांनी दीपप्रज्वलन केले. रोहिणी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.