दहावी आणि बारावी परीक्षा जाहीर
मेच्या दुसऱ्या आठवड्यात पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षा आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी दिली आहे.
बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली असून ३० टक्के अभ्यासक्रमात कपात केला असल्याचेही त्यांनी सांगितले. कोविडमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहेत.
यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षात कोणताही त्रास होऊ नये, या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमात कपात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोविडमुळे शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या हजेरी कमी भरल्या आहेत. त्यामुळे परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्या, यावर अजूनही आम्ही विचार करत असून मेच्या दुसऱ्या आठवड्यात पीयूसी द्वितीय आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.