आर्थिक संकटात असणाऱ्या नागरिकांना हेस्कॉमसह वीज वितरण कंपन्यांनी झटका दिला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच राज्यात वीज दरवाढ करण्यात आली होती. आता पुन्हा दोन महिन्यात वीज दरवाढीचे संकेत देण्यात आले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा आर्थिक झळ बसणार आहे.
वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक मंडळाकडे पाठविण्याची तयारी सिरी असून वीज दरवाढीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
१ एप्रिल २०२१ पासून पुन्हा वीजदरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना आता वाढीव वीजबिलाचा फटका सोसावा लागणार आहे.
वीजदरात तूट भरून काढण्यासाठी दरवाढ करणे अनिवार्य असल्याचे वीज वितरण कंपन्यांचे म्हणणे आहे. मात्र, नोव्हेंबरमध्ये वीजदरवाढ केली असूनही पुन्हा दरवाढ होत असल्याने नागरिकांसह औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनाही झालं बसणार आहे.
मागील वर्षी प्रतियुनिटमागे ३३ पैशांची दरवाढ करण्यात आली होती. तर यंदा दरवाढीचा पुन्हा शॉक बसणार असून घरगुती वीज बिलासह औद्योगिक क्षेत्रातील आस्थापने, पंपसेट, कुटीर ज्योती, भाग्यज्योती योजनेंतर्गत वीज जोडणी करण्यात आलेल्या नागरिकांनाही वाढीव दराचा फटका बसणार आहे.