कंग्राळी खुर्द (ता. बेळगांव) येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी सायकल प्रवासाद्वारे कोल्हापूरला जाऊन श्री ज्योतिबा देवाला रायगडवर होणाऱ्या 32 मन सुवर्ण सिंहासनासाठी व अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिरच्या निर्माणासाठी साकडं घातले.
कंग्राळी खुर्द येथून भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची पूजा करून सायकल घेऊन या गावातील धारकरी संदेश पाटील, सौरभ पाटील, कार्तिक पाटील (सर्व रा. पाटील गल्ली) तसेच ओमकेश जाधव (रा. जाधव गल्ली) आणि प्रशांत कामुचे (रा. छ.शिवाजी गल्ली) या सर्वांनी सायकलवरून जाऊन रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासनचे काम लवकरात लवकर पूर्ण होवो.
तसेच अयोध्या येथे सुरू असलेल्या राम मंदिरा निर्माणाचे काम सुद्धा लवकरच पूर्ण होवो, या मागणीसाठी कोल्हापूर येथील ज्योतिबा मंदिर गाठले.
ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊन पन्हाळगड व अंबाबाई मंदिर येथे जाऊन दर्शन घेऊन आज ते परत कंग्राळी खुर्द येथे पोहोचले आहेत. या सर्वांचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व कंग्राळी खुर्द ग्रामस्थ यांच्यावतीने सत्कारासह कौतुक करण्यात आले.