21 जानेवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला पोलीस प्रशासनाने बैठक घेत खडे बाजार पोलीस स्थानकात मराठी भाषिक नेत्यांशी चर्चा केली.
सीमाभागातील मराठी आवाज दडपून कपड्याचा प्रकार पुन्हा एकदा सुरू झाला आहे. मोर्चासंदर्भात मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक खडेबाजार पोलीस स्थानकात घेण्यात आली. या बैठकीत पोलिसी दडपशाहीचा प्रकार निदर्शनास आला.
महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेला लाल – पिवळा हटविण्यात यावा, अशी मागणी मराठी भाषिकांच्या वतीने सातत्याने करण्यात आली आहे. परंतु प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीने सातत्याने मागणी उचलून धरली आहे. कन्नड संघटनांनी आपला हट्ट कायम ठेवण्यासाठी हा झेंडा फडकविला आहे .हा ध्वज हटविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सातत्याने करण्यात आली .
परंतु प्रशासनाने याबाबतीत कोणतेही पाऊल उचलले नाही. याबाबत प्रश्नाला डेडलाईन देण्यात आली. परंतु अद्यापही हा ध्वज हटविण्यात आला नाही. या बेकायदेशीर कृतीच्या निषेधार्थ दिनांक 21 रोजी भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे.
या मोर्चासंबंधी चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला पोलीस प्रशासनाने समिती नेत्या कडून माहिती जाणून घेतली रीतसर अर्ज देण्याची सूचना केली.
या बैठकीला मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, माजी महापौर सरीता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, समिती आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.