महानगरपालिके समोर कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फडकाविलेला लाल – पिवळा हटविण्यासाठी समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
हा लाल – पिवळा त्वरित हटविण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. यासाठी प्रशासनाने वेळ दिला असून या वेळेत हा लाल – पिवळा हटविण्यात आला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला. या पार्श्वभूमीवर शहर, तालुक्यात अनेक ठिकाणी युवा समितीच्यावतीने बैठक होत असून हा मोर्चा बहुसंख्येने यशस्वी करून प्रशासनाला मराठी जनतेचा हिसका दाखविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
कारभार गल्ली वडगाव येथे झालेल्या बैठकीत हा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीला मोनाप्पा बाळेकुंद्री, यल्लाप्पा कणबरकर हे ज्येष्ठ पंच उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक मनोहर हलगेकर यांनी केले. बैठकीच्या सुरुवातीला या भागातील निधन झालेल्या व्यक्तींसाठी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मोर्चासंबंधी चर्चा करण्यात आली. रतन मासेकर, ज्ञानेश्वर मन्नूरकर, नितीन खन्नूकर, शांताराम होसूरकर, महादेव पाटील, शुभम शेळके, किरण धामणेकर, शिवराज पाटील, मनोहर हलगेकर यांची भाषणे झाली.
या बैठकीला मनोहर हलगेकर, ज्ञानेश्वर मन्नूरकर, दिलीप बाळेकुंद्री, महेश जुवेकर, दिलीप नाईक, शिवराज पाटील, बाळू मणगुतकर, रतन मासेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.