पाटोदा ग्रामपंचायत गेली २५ वर्षे सांभाळत आदर्श सरपंच म्हणून बिरुदावली मिळवणाऱ्या भास्कर राव पेरे पाटलांना सीमावासियांच्या तळतळाट भोवला आहे. गेल्या २ दिवसांपूर्वी बेळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सीमावासीयांना ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ असा अनाहूत सल्ला दिला.
सीमाप्रश्नाची तळमळ आणि महाराष्ट्रात जाण्याची सीमावासियांच्या आस याचे गांभीर्य नसलेल्या भास्कर पेरे पाटलांना त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच परतावा मिळाला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल साईटवर त्यांना ट्रोल करण्यात येत असून त्यांच्या विरोधात तरुणांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगावमधील मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रकार भास्कर पेरे पाटील यांच्याकडून झाला. त्यांच्या व्याख्यानानंतर अनेक ग्रामपंचायतींमध्ये त्यांना निमंत्रण देण्याचा विचार करण्यात आला. परंतु मराठी भाषिकांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सीमाभागातून त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.
भास्कर पेरे पाटील यांची कन्या अनुराधा पेरे पाटील या महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. भास्कर पेरे पाटील यांच्या पॅनेलचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला असून त्यांच्या मुक्ताफळांची परतफेड त्यांना मिळाली असल्याचे मत सीमाभागात व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी फेसबुकच्या माध्यमातून पेरे पाटलांना टार्गेट केले असून, सगळं व्यवस्थित सुरु असताना अचानक बेळगावमध्ये येणाऱ्या पेरे पाटलांनी राज ठाकरे बनायला जाऊन बेळगावकरांना अनाहूत सल्ला दिला. दिल्या घरी तू सुखी रहा, भांडू नका असा सल्ला देत शेकडो हुतात्म्यांचा त्यांनी अपमान केला. सीमाप्रश्नासाठी शेकडो हुतात्म्यांनी सांडलेल्या रक्ताचा, बलिदानाचे गंभीर पाटलांना नसून सध्याच्या पिढीला देखील संघर्ष करावा लागतो.
त्यामुळे बोलायच्या आधी राजसाहेबांनी विचारायचं तरी! कि याच हुतात्म्यांचा तळतळाट कसा असतो? अशी खोचक प्रतिक्रियाही शुभम शेळके यांनी मांडली आहे. अजूनही वेळ गेली नसून या लढ्यातील हुतात्म्यांची आणि ६५ वर्षांपासून या अन्यायाला तोंड देत लढा जिवंत ठेवलेल्या सीमावासीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी शुभम शेळके यांनी केली आहे.
https://www.facebook.com/100007222360020/posts/2785932548324130/
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3850590798334021&id=100001494162915