Wednesday, November 20, 2024

/

2019 च्या तुलनेत 2020 मध्ये घडली अधिक खून प्रकरणे

 belgaum

बेळगाव पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील शहर व तालुक्याच्या भागांमध्ये गेल्या 2020 सालामध्ये तब्बल 22 खून प्रकरणे घडली असून 2019 च्या तुलनेत ही आकडेवारी अधिक आहे. तथापि लॉक डाऊन व कोरोनामुळे दिवसा घरफोड्या, भुरट्या चोर्‍या आणि फसवणुकीच्या प्रकरणात घट झाल्याचे दिसून येते.

यंदा कोरोनामुळे लॉक डाऊन झाल्यानंतर इतर प्रकारच्या गुन्हेगारीत घट झाली असली तरी अनैतिक संबंध, पूर्ववैमनस्य आदी कारणावरून खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 2019 मध्ये 15 खून घडले होते, तर 2020 मध्ये त्याची संख्या 22 झाली आहे. अल्पवयीन मुलींची छेड काढणे, अत्याचार, अपहरण करणाऱ्यांवर पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येत असल्यामुळे गेल्या वर्षी लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मात्र घट झाल्याचे दिसून येते.

2019 आणि 2020 या वर्षात घडलेल्या गुन्ह्यांची तुलनात्मक आकडेवारी अनुक्रमे 2019 -2020 या पद्धतीने पुढीलप्रमाणे आहे. खुनाच्या घटना : 15 -22, खुनाचे प्रयत्न : 61 -52, दरोडे : 2 -1, सोनसाखळी लांबवणे : 9 -4, दिवसा घरफोडी : 57 -25, रात्री घरफोडी : 57 -57, भुरट्या चोऱ्या : 207 -174, फसवणूक : 105 -59, अपघात : 154 -115 आणि

 

लैंगिक अत्याचार : 18 -16. दरम्यान, आतापर्यंत अनेक प्रकरणात अटक केलेले संशयित हे केवळ चैनीसाठी चोऱ्या करण्यामध्ये गुंतले असल्याचे उघडकीस आले आहे. कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या बेळगाव शहर परिसरात चोर्‍या, दरोडे व खून करून फरारी होणे सोपे बनले आहे. त्यामुळे दरवर्षी गुन्हेगारीत वाढ होत चालली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.