Sunday, November 17, 2024

/

दोन मुलांसह आई-वडिलांची विष पिऊन आत्महत्या

 belgaum

पती -पत्नीने आपल्या दोन मुलांसह विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रामदुर्ग (जि. बेळगाव) येथे आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रवीण शेट्टर (वय 37, रा. रामदुर्ग) त्याची पत्नी राजेश्वरी (वय 27) मुले अमृता (वय 8) आणि आद्विक (वय 6) अशी मृतांची नांवे आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच सीपीआय शशिकांत वर्मा यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळाकडे धाडले. स्थानिक आमदार महादेवप्पा यादवाड यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. मयत प्रवीण शेट्टर यांचे रामदुर्ग शहरात खताचे दुकान होते.

शेट्टर कुटुंबियांच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी रामदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.