गेल्या 2 दिवसांपासून मच्छे येथे होणाऱ्या कार्यक्रमा संदर्भात गैरसमज पसरवण्यात येत होते की युवा समिती मार्फत विरोध होतोय, काल कार्यक्रमाच्या आयोजकांशी भेटून आम्ही तो दूर करण्याचा प्रयत्न केला. अशा गोष्टीत राजकारण आणून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत होता आणि दुर्दैव म्हणजे गैरसमज पसरवण्यात आम्ही आपलं समजत असणाऱ्यांच नाव समोर येतंय. संयुक्त महाराष्ट्र हे आपलं एकमेव ध्येय आहे. आणि त्यासाठीच आपण कार्य करायचं आहे.
कोण कुठला कार्यक्रम घेतंय आणि कुणाला बोलवतय हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपली संघटना वाढवावी आणि बेळगावचा इतिहास गौरवशाली करावा याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे कुणाच्या कार्यक्रमाला विरोध करून किंवा बंद पाडवून काही साध्य होणार नाही.
आणि आम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाणार देखील नाही, आमच्या संघटनेसमोर कित्येक संकटे आली तरी आम्ही ती कार्यकर्त्यांच्या आणि मराठी भाषिकांच्या पाठिंब्यावर थोपवली आहेत आमची बंधिलकी मराठी भाषा आणि सीमालढ्याशी आहे आणि म्हणून आपला लढा घरा घरात पोहचवणे जास्त महत्वाचे आहे.
त्याचसाठी युवा समिती बाबत जे गैरसमज निर्माण केले जात आहेत ते बिनबुडाचे असून आमच्या संघटनेचा किंवा संघटनेच्या पदाधिकारी यांचा सदर किंवा तत्सम कार्यक्रमाला कोणताही विरोध नाही असे आम्ही जाहीर प्रकटन देत आहोत.
*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव.*