आज कोडोली येथे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कर्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. माधुरी शानभाग होत्या. कोरोनामुळे हे संमेलन दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. या ग्रंथदिंडीत मान्यवर, भजनी मंडळ आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.
संमेलन स्थळी ग्रंथदिंडी पोहोचल्यानंतर अशोक नाईक यांच्याहस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. यानंतर स्वामी विवेकानंद संमेलन नगरीचे उदघाटन जीवन संघर्ष फाउंडेशनचे प्रमुख डॉ. गणपत पाटील, संमेलन व्यासपीठाचे उदघाटन महेश होनगेकर, ग्रंथ दालनाचे उदघाटन डॉ. लक्ष्मण पाटील, शिवप्रतिमापूजन रुक्मिणी निलाजकार, सरस्वती प्रतिमापूजन पी. आर. पाटील, संत ज्ञानेश्वर प्रतिमापूजन ऍड. शाम पाटील,महात्मा जोतिबा फुले प्रतिमापूजन उमेश देसाई, पालखी व ग्रंथपूजन हभप अप्पय्या पावणोजी यांच्याहस्ते पार पडले.
पहिल्या सत्रात प्रा. माधुरी शानभाग यांनी साहित्यनिर्मिती आणि सृजनशीलता या विषयावर व्याख्यान दिले. नवीन साहित्यिक घडावेत, नवीन साहित्य उपलब्ध व्हावे, हि काळाची गरज असल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले. समाजातील विदारक चित्र डोळ्यासमोर आल्यास त्यातून साहित्यनिर्मिती होते. वेदना, एखादी घटना किंवा प्रसंग यातून साहित्य निर्मिती होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रत्येकाने वाचन आणि लेखनाची सवय लावून घेणे गरजेचे असून दैनंदिनी पासून आपण लिखाणाला सुरुवात करा असा सल्ला त्यांनी दिला.
यानंतर दुसऱ्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात आमंत्रित कवींनी बहारदार कविता सादर केल्या. यामध्ये भरत गावडे, भरत जाधव, रोशनी हुंदरे, मनीषा नाडगौडा यांच्यासह इतर कवींचा सहभाग होता. या कविसंमेलनाचे सुत्रसंचलन शिवाजी शिंदे यांनी केले.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1302295703461353/