प्रश्नपत्रिका फुट्ल्याप्रकरणी १४ जणांना अटक-संपूर्ण राज्यातील विविध ठिकाणच्या प्रथम श्रेणी सहाय्यक पदाच्या रिक्त पदांसाठी लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे निदर्शनास येताच या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणातील १४ जणांना सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सदर प्रश्नपत्रिकांची तब्ब्ल १० लाख रुपयांना विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील इतर समावेश असलेल्या आरोपींचा पोलीस तपास घेत आहेत.
याबाबत अधिक माहित अशी कि, या प्रकरणात सामील असलेले ८ आरोपी माहिती मिळाल्यानंतर १२ तासाच्या आतच पोलिसांच्या अटकेत आले. त्यानंतर इतर आरोपींची माहिती मिळताच आतापर्यंत एकूण १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शनिवारी राचप्पा आणि प्रकाश अशा दोघांसहित ६ जणांना अटक करण्यात आली होती. पोलीस तपासात या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता यामध्ये आणखी काही मास्टरमाइंड लोकांचा समावेश असल्याची माहिती उपरोक्त दोघांनी काबुल केली. यांचा तपास घेत पोलिसांनी इतर आरोपींना अटक केली असून या प्रश्नपत्रिकांची विक्री तब्ब्ल १० लाख प्रति प्रश्नपत्रिका अशी करण्यात येत असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
बंगळूर सीसीबी पथकाने केलेल्या या कारवाईत सीसीबीचे जॉईंट पोलीस कमिशनर संदीप पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना वरील माहिती दिली आहे. या परीक्षांची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे केपीएससी कडून जाहीर करण्यात आले आहे.