कृषी कायद्याविरोधात चलो राजभवनची हाक : सतीश जारकीहोळी
केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांकडून देशभरात आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी जाहीर केले आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवार दि. 20 रोजी चलो राजभवन आंदोलन हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सदर माहिती दिली. केंद्र सरकारने लागू केलेला कृषी कायदा शेतकऱ्यांच्या विरोधातील असून या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. आधीच अडचणीत असलेला शेतकरी या कायद्यामुळे अजूनच अडचणीत येणार आहे.
यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून राजधानी दिल्ली येथे शेतकर्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरीविरोधी असणारा कायदा रद्द करावा, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आपल्यालाही पाठिंबा असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी जाहीर केले.