Sunday, November 24, 2024

/

सीमाभाग महाराष्ट्राचाच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पुरावा

 belgaum

60 वर्षांपूर्वी कारवारमधल्या एका शाळेत इंग्रजी -मराठी व कोंकणीतून अर्थ शिकवणारी शिक्षिका, एनसीसी बटालियनचा जुना मराठी नाम फलक, कानडा जिल्ह्याचे “विचारी” हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, 1992 चा कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मराठी वार्षिक अहवाल. बेळगावमधील 1890 मध्ये बांधलेल्या पुलाचा मराठीतला शीलाफलक अशाप्रकारे कर्नाटकातल्या सीमा भागामध्ये 100 -125 वर्षापूर्वी पासूनच्या मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे पुरावे सलगपणे समोरच्या कृष्णधवल पडद्यावर उलगडत जातात आणि आपण स्तिमित होतो. महाराष्ट्र राज्याच्या महिला व जनसंपर्क संचालनालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा पुरावा सादर केला आहे.

सध्याच्या सीमाभागातील वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाने 50 वर्षांपूर्वी तयार केलेला “अ केस फोर जस्टीस” हा 35 मिनिटाचा अप्रतिम आणि संग्रह्य लघुपट सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. पूर्वीच्या रिळांवर चित्रीकरण केलेल्या या चित्रपटाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डिजिटल स्वरूपात पुनरुज्जीवित केल्याने इतका जुना दस्तएवज आपण सहजपणे पाहू शकतो. हा लघुपट आपण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://www.youtube.com/watch? V=y_3pi36ia-c या युट्युब वर वाहिनीवर पाहू शकतो.

“घडली माला अश्रू फुलांची” या सामाजिक नाटकाचा नोव्हेंबर 1970 मधला मराठीतला फलक, 1939 मधील स्थापना झालेल्या कारवारच्या मराठी महिला मंडळाची बैठक, तत्कालीन म्हैसूर राज्यातील नामांकित नेते आनंद नाडकर्णी यांचे 1992 मधील मराठीतले दत्तक पत्र, कानडा जिल्ह्यातील 1960 मधील पहिले मराठी वृत्तपत्र, 1980 मधला बेळगाव मुनिसिपलिटीने बांधलेल्या पुलावरील मराठीतील शीलाफलक, कोळी पुरुष आणि महिलांची त्याकाळची महाराष्ट्रीय वेशभूषा असे नानाविध पुराव्यांचे प्रभावी चित्रकरण या लघुपटात पाहायला मिळते. तसेच यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांनी सीमाप्रश्नासंदर्भात बैठका आणि सभांमधून केलेल्या भाषणांचे व्हिडिओ देखील आपण पाहू शकतो.Thakrey

सीमाप्रश्नाबाबत 50 वर्षांपूर्वी महाराष्ट्राने तयार केलेला दृक्श्राव्य स्वरूपातील हा दस्तऐवज सीमाभागातील आणि मराठी बेळगाव शहरातील लोकजीवन, व्यापारी आणि अन्य व्यवहार, रोजची भाषा वृत्तपत्रांचा वापर, शाळा, देवळे, मठ, पोथ्या, मराठी गाणी, भजन/कीर्तन, नगरपालिका दस्तऐवज, व्यापारी चोपड्या, खतावणी, शिलालेख असे जवळपास हजारो फुटांची लांबी भरेल एवढे चित्रीकरण करून तयार केलेला हा माहितीपट आहे.

कुमारसेन समर्थ, विश्राम बेडेकर यांचे दिग्दर्शन आणि मार्गदर्शन, या माहितीपटाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन केले होते तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, शिवाजीराव गिरधर पाटील आणि शरद पवार यांनी. मुख्यमंत्र्यांचे तत्कालीन जनसंपर्क अधिकारी मधु मंगेश कर्णिक यांची संकल्पना, संहिता, लेखन असलेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शक होते चित्रपट तज्ञ कुमारसेन समर्थ. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विश्राम बेडेकर, निवृत्त मुख्य सचिव एम. डी. भट (आयसीएस) आणि ना. ग. नांदे यांचे मार्गदर्शन या माहितीपटाची घेण्यात आले आहे.

निर्मितीसाठी जुनी मराठी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन बेळगावच्या नगराध्यक्षा इंदिराबाई खाडे, शिवाजीराव काकतकर, बळवंतराव सायनाक, बाबुराव ठाकूर, निळकंठराव सरदेसाई तसेच सर्वश्री मनसे मुचंडी, जुवेकर आणि याळगी यांनी निर्मितीसाठी सहकार्य केले. तत्कालीन आमदार बापूसाहेब एकंबेकर यांनीही त्यावेळी मदत केली. ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे इंग्रजी संहितालेखन आणि बर्कली हिल यांचे प्रभावी निवेदन याला लाभले आहे.

https://www.facebook.com/375504746140458/posts/1314543112236612/

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.