महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील कांदा मार्केट मधील दुकानांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. आज महानगरपालिकेच्या वतीने लिलाव प्रक्रिया हाती घेण्यात आली असता येथील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध करून आंदोलन छेडले.
शुक्रवारी कांदा मार्केट परिसरात सुरु करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेला या परिसरातील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध करून निदर्शने केली. यावेळी ऍडव्होकेट प्रवीण यांनी हस्तक्षेप केला.
आणि यासंदर्भात ४ जानेवारी रोजी हायकोर्टाचा आदेश जाहीर करण्यात येणार असून हि जागा महानगरपालिकेत समाविष्ट नसून महानगरपालिकेने हाती घेतलेली मोहीम हि योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महानगरपालिका येथील जागांचा लिलाव करू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
महानगरपालिका विरुद्ध कांदा मार्केट व्यापारी असा जोरदार वाद आज कांदा मार्केट परिसरात पहावयास मिळाला. या जागेच्या लिलावासाठी जोरदार वाद होत असून यासंदर्भात पोलिसांनी हस्तक्षेप करावा यासाठी व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे.
४ जानेवारी रोजी यासंदर्भात हायकोर्याचा आदेश येईपर्यंत पोलीस आयुक्त कोणता निर्णय घेतात, याची प्रतीक्षा कांदा मार्केट मधील व्यापारी करत आहेत.