Saturday, November 23, 2024

/

राहुलच्या मदतीला धावले खानापूरकर : “चव्हाटा स्पोर्ट्स”कडून भरघोस मदत

 belgaum

खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथील किडनी विकाराने त्रस्त असलेल्या राहुल बिदरभावीकर या 20 वर्षीय तरुणाच्या उपचारासाठी अनेक दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. चव्हाटा स्पोर्ट्स खानापूर यांच्यावतीने खानापूर येथे आयोजीत हॅथवे ट्रॉफी भव्य क्रिकेट स्पर्धेचे औचित्य साधून राहुल याला 34,151 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

बेळगांव लाईव्ह, दैनिक सकाळ, तरुण भारत, पुढारी, बेळगावकर डॉट कॉम, ऑल अबाउट बेलगाम, नेशन टुडे, बेलगाम सोशल नेटवर्क यांनी राहुलाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्या उपचारासाठीची बातमी वेळोवेळी प्रसिद्ध करून सहकार्य केले होते. त्यामुळे राहुलच्या मदतीसाठी अनेक लोक समोर येताना दिसत आहेत. कालच राहुलचा मित्र ज्ञानेश्वर बेडरे याने आपली आर्थिक परिस्थिती नसतांनाही आपल्या मित्राच्या उपचारासाठी स्वतः कर्ज काढून त्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

खानापूर येथील हॅथवे ट्रॉफी भव्य क्रिकेट स्पर्धेवेळी राहुलच्या उपचारासाठी झटत असलेल्या तसेच कोरोना काळात खानापूर भागात रुग्णासाठी पीपीई किट, ऑक्सिजन सिलेंडर,व वैद्यकीय मदत करणाऱ्या फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, राहुलला मोफत एमबुलन्स सेवा देणाऱ्या गणेश रोकडे त्याच बरोबर राहुलला मदत करणारा त्याचा कारखान्यातील मित्र ज्ञानेश्वर बेडरे, समाजसेवक नागराज कलबुर्गी, भरमानी बेंद्रे, सागर चौगुले आणि सुनील पारीश्वाडकर यांचा चव्हाटा स्पोर्ट्स खानापूर यांच्यावतीने मैदानावर सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे सुनील पारीश्वाडकर, वासुदेव झुंजवाडकर, नन्हेसाब मुजावर, वैभव पाटील, महादेव चव्हाण, रामा कर्लेकर, गजानन पाटील, प्रमोद पाटील, सुनील मासेकर, महादेव कदम आदी उपस्थित होते.

तेंव्हा राहुलच्या मदतीसाठी खानापूरकरांनीही पुढे यावे आणि कर्नाटक ग्रामीण विकास बँक शाखा गर्लगुंजी Ac.No.89059682631(ifsc code KVGB0002603) या राहुलच्या अकौंटवर आपली मदत जमा करावी किंवा 9071207625 या क्रमांकाशी संपर्क साधावाअसे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी सुनील पारीश्वाडकर 9731974661 तसेंच सागर चौगुले 9108452634,संतोष चौगुले 8208641511 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.