बेळगाव तालुक्यातील 28 गावांमध्ये बुडा जमीन ताब्यात घेण्यासाठी हालचाली गतिमान करत आहे. त्या विरोधात तालुका पंचायतीच्या बैठकीत मोठ्या प्रमाणात गदारोळ करण्यात आला.
संपूर्ण सदस्यांनी पाठिंबा देत यापुढे कोणत्याही प्रकारे जमीन ताब्यात घेऊ नये आणि जी नोटीस पाठवली आहे त्याला उत्तर देण्याचे काम तातडीने करावे अन्यथा याबाबत गंभीर परिणाम होतील असे तालुका पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले. याबाबत ठराव पुन्हा एकदा करण्यात आला. दरम्यान सुनील अष्टेकर यांनी तातडीने आवाज उठवत संबंधित अध्यक्षांना धारेवर धरले.
बुडाला याबाबत कायदेशीर प्रश्न विचारला तसेच कायदेशीर नोटीस पाठवून दिले आहे. बुडाकडून कोणतेही उत्तर आले नाही. याकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊ असे हे सांगण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागातील शेत जमिनी बुडा घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.
त्यामुळे याकडे साऱ्यांचेच लक्ष द्यावे. गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या तर त्यांच्या पोटापाण्याचे हाल होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे जमीन घेऊ नये असा ठराव करण्यात आला.
यावेळी अनेकांनी त्याला संमती दर्शवली. बुडा बैठकही करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे यापुढे जर अशाप्रकारे जमीन घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल तर संबंधितावर कारवाई करण्याचा बडगा उगारावा असेही सांगण्यात आले. यावेळी उदय सिद्धांण्णावर, लक्ष्मी मेत्री, काशिनाथ धर्माजी, नीना काकतकर, नारायण नलवडे,मधुरा तोरसे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.